Header Ads Widget

Responsive Advertisement

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.


उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्याल? त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सोपे उपाय

उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्यावर घाम, तेलकटपणा, टॅनिंग आणि पिंपल्स यांसारख्या समस्या वाढू लागतात. वाढते तापमान आणि सूर्याची तीव्र किरणे त्वचेचे नुकसान करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. नेहमी योग्य स्किन केअर क्रीम आणि काही घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमची त्वचा ताजीतवानी आणि चमकदार नक्कीच ठेवू शकता.

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी का घ्यावी?

उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो. त्यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होऊन पिंपल्स, काळेपणा आणि पुरळ होण्याची शक्यता वाढते. तसेच सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू शकते.

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय

1. दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा

चेहऱ्यावर साचलेली धूळ, घाम आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी साधा फेसवॉश वापरा. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि पिंपल्स (मुरूम) कमी होण्यास मदत होते. 

2. भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या चमकदार राहते आणि डिहायड्रेशन टाळता येते.


3. सनस्क्रीनचा वापर करा

घरातून बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लावा. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.

4. घरगुती फेस पॅक वापरा

काकडी, गुलाबपाणी, दही आणि चंदन यांसारखे नैसर्गिक घटक त्वचेला थंडावा देतात.

खालील प्रमाणे घरगुती फेस पॅक बनवू शकता :

  • २ चमचे दही
  • १ चमचा चंदन पावडर
  • थोडे गुलाबपाणी

हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. अतिशय सुंदर वाटते.

5. तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा

अधिक तेलकट पदार्थांमुळे त्वचेवर पिंपल्स म्हणजेच मुरूम येऊ शकतात. त्यामुळे फळे, भाज्या आणि ताजे अन्न खाण्यावर भर द्या.

उन्हाळ्यात त्वचेसाठी ही काही उपयुक्त फळे:

उन्हाळ्यात खालील फळे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात:

  • कलिंगड
  • काकडी
  • संत्री
  • पपई
  • आंबा

ही फळे शरीराला थंडावा देतात आणि त्वचा निरोगी ठेवतात.

उन्हाळ्यात योग्य काळजी घेतली तर त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहू शकते. नियमित स्वच्छता, योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय यांचा वापर करून तुम्ही सहजपणे उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेऊ शकता.

जर तुम्हाला अशाच आरोग्यविषयक आणि आयुर्वेदिक टिप्स वाचायला आवडत असतील, तर Growthway Family Care ला नक्की भेट द्या.

Post a Comment

0 Comments